‘लेझीम’ : आनंददायी शिक्षणाचा नितांतसुंदर आविष्कार
आजच्या प्राथमिक आणि एकूणच शिक्षणाचा दर्जा घसरत चाललेला असताना आनंददायी शिक्षण विद्यार्थ्यांना कसं द्यावं, हे दिग्दर्शक प्रवीण डाकरे यांच्या ‘लेझीम’ या शैक्षणिक लघुपटातून पाहायला मिळतं. खेडोपाडी ग्रामीण विभागातील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी असे प्रयत्न आज होताना दिसत नाहीत. त्यांच्यातल्या कलागुणांना हेरून त्याप्रमाणे शिक्षण देणाऱ्या शाळा आणि शिक्षक सध्याच्या घडीला दुर्मीळ होत चालले आहेत.......